नासिक नस्ती 2
निष्ठा.
माननीय नरेंद्र मोदींनी काल एक दिव्यांग कार्यकर्ता, थिरू एस मणिकंदन सोबत ची सेल्फी व्टिट केली व सांगितले की हा बुथ प्रमुख आपल्या कमाईचा एक हिस्सा पक्षाला देतो.
ही बातमी वाचली व मला संतोष मोरे ची आठवण झाली. अश्याच प्रामाणिक व निष्ठावान लोकांवर पक्ष मोठा होतो.
संतोष मोरे हा भाजपचा जुन्या नाशकातील निष्ठावान कार्यकर्ता. बुरड गल्लीत त्याची कटलरी ची टप्परी होती. सकाळी माल भरायचा व दिवसभर विकायाचा . रोजचे जेमतेम शंभर रूपये मिळत असत.
माझ्या कडे भा.ज.प. ची जुने नासिक द्वारका मंडळाची अध्यक्ष म्हणून जवाबदारी होती.
पक्षाचा सक्रिय सभासद नोंदणी कार्यक्रम चालू होता. संतोष कडे सभासद नोंदणी ला गेलो, सोमवार असेल संतोष म्हणाला गुरवारी नोंदणी करतो व भाऊ तू येऊ नको मीच फोन करून ऑफिस ला येतो.
गुरुवारी सांगितल्या प्रमाणे तो आला व सक्रिय सभासदाची पावती घेतली. त्याच वेळेस अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पंचवीस तीस चकरा मारायला लावल्या. एक नगरसेवकाला तर वरतून एका पदाधिकाऱ्यांकडून तंबी दिली उमेदवारी मिळणार नाही तेव्हा सभासद झाला. हाच नगरसेवक पदरचे पैसे खर्च करून कधी पुष्प गुच्छ ही घेत नव्हता. नोंदणी करतांना मला लक्षात आले नाही. पण नंतर एक सायंकाळी शांत विचार करत असताना लक्षात आले संतोष ने त्याच्या तीन दिवसाची पुर्ण कमाई सभासद नोदणी साठी दिली होती. उद्या कसं होईल याचा कोणताही विचार त्याच्या मनात आला नसेल का ?.
इतर वेळेस ही तो पक्ष कार्याला पदर मोड करायचा.
दुसरा प्रसंग विधान सभा निवडणूक.
घास बाजारात मौलाना आझाद शाळेत एक केंद्र आहे येथील पिंजार घाट, घास बाजा, कोकणी पुरा वाकडी बारव ह्या मुस्लिम बहुल भागातील बुथ वर तेव्हा आमच्या कडे कोणी सभासद नव्हते. घास बाजारात कधी बुथ पण लागत नव्हता. मी संतोष ला म्हणटलं ह्या वेळेस बाहेर बुथ लाव व प्रत्येक केंद्रातील प्रत्येक केंद्रावर प्रतिनिधी बसव . संतोष ने जबाबदारी घेतली. मतदानाच्या दिवशी मंडप टाकला प्रत्येक केंद्रावर प्रतिनिधी बसवले व पंचवीस तीस कार्यकर्त्या सोबत दिवस भर बाहेर ठाण मांडून बसला.
तिस-या दिवशी तो माझ्या कार्यालयात आला मला एक चिठ्ठी दिली व त्या सोबत काही पैसे परत केले . चिठ्ठीत पैश्यांचा हिशोब होता. मी मंडप जेवणासाठी काही पैसे संतोष ला दिले होते, तो खर्च जाऊन सात हजार उरले होते ते त्याने परत केले होते. दुसरी कडे मला नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून जास्तीच्या पैशा साठी निरोप येत होते.
संतोष ला हृदयाच्या व्होल्व ची समस्या होती. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. शस्त्रक्रिया करणे आवश्य होते. त्याने मग शिर्डी संस्थान च्या रूग्णालयात उपचार घेतले. नंतर नासिक ला खाजगी दवाखान्यात फाॅलोअप चालू होते. आता तो चांगला झाला असं वाटत असतानाच तो आकस्मिक आम्हाला सोडून गेला.
संतोषच्या जाण्याने एक प्रामाणिक सहकारी, एक जिवाभावाचा मित्र मी गमावला.
संतोष ला विनम्र अभिवादन.
योगेश कासारपाटील


No comments:
Post a Comment