नासिक नस्ती
सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागलेले आहेत. विशेषता भाजप शिवसेना उद्धव गट राष्ट्रवादी काँग्रेस हे विधानसभेच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. आजकाल चर्चा ही आयाराम गायरामांचीच आहे. इकडून तिकडे उड्या चालू आहे आणि हे वर्षभर होत राहील.
गेल्या निवडणुकीत युद्धाच्या आधीच शस्त्र टाकणारे विरोधक आज बऱ्यापैकी तयारी करत आहेत नाशिक शहराचा विचार केला तर महापालिकेची सत्ता भाजपकडे होती. पण आगामी महापालिका विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजपच्या दृष्टीने गणित अवघड आहे शहरातील भाजपचा शहराचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे या अंतर्गत वादात अध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. वरतून आलेले कार्यक्रम राबवणे व रिकाम्या जागा भरून रिपोर्ट देणे एवढेच काम पक्ष पदाधिकारी करताना दिसतात. पार्टी विथ डिफरन्सची, अवस्था काँग्रेस सारखी झालेली दिसते.
पक्षनिष्ठे पेक्षा व्यक्ती निष्ठा तपासली जाते.
भाजपची सर्व मदार ही मोदींवर आहे पण महापालिका व विधानसभेला यावेळेस मोदी घटक आता परिणामकारक व निर्णायक ठरू शकणार नाही.
काँग्रेस आय ने खूप वर्षानंतर अध्यक्ष दिला पण अंतर्गत गटबाजी मुळे नवीन अध्यक्ष ला स्वीकारण्यास एक गट तयार नाही त्यामुळे शहरात दोन काँग्रेस आहेत का असा संभ्रम लोकांमध्ये दिसतो काँग्रेसच्या नेत्यांचा काँग्रेस जोडो अभियान कशामुळे परिणामकारक झाले नाही याचा प्रत्यय नाशिकचा अभ्यास केल्यास नक्कीच काँग्रेसवाले करू शकतात.
शिवसेना उद्धव गट शहरामध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्याचे आपला अस्तित्व वाढवण्यासाठी नियोजन करीत आहे. पण त्यांच्याकडे पण नेत्वृत्वाचा अभाव दिसतो.
विरोधकांमध्ये सर्वात शिस्तबद्ध नियोजनपूर्वक काम होत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या तरी अंतर्गत वाद गटतट संपल्यासारखे दिसत कमीत कमी भासत तरी आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले वर्चस्व आहे व शहरात जर भुजबळ कुठंबियातील कोणी लक्ष घातलं तर गुणात्मक फायदा होईल.
त्यामुळे आगामी काळामध्ये निवडणुकीमध्ये विरोधकांत सर्वात जास्त फायदा होईल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसलाच.
सध्या विरोधक वज्रमूठ तयार करण्याचं काम करत आहे. ही वज्रमूठ निवडणुकीपर्यंत कायम राहिली तर चांगले परिणाम विरोधकांना म्हणजेच मविआ ला दिसतील.
पुलोदच्या काळातील निकाल परत जिल्ह्यात दिसू शकेल.
-भटक्या

No comments:
Post a Comment