Saturday, July 29, 2023

लोकनेता


ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार 

आज आमचे मार्गदर्शक, मोठे बंधू, मा. सुधीरभाऊंचा वाढदिवस.

 त्यांच्याशी स्नेह  बेरोजगार अभियंता संघटने मुळे आला. कालांताराने त्यांची मॅजेस्टिक मधील खोली आमचे हक्काचे स्थान झाले. त्यांच्या आपुलकी मुळे संपर्क आजूनच वृद्धिंगत झाला. सत्तेत असो वा नसो आमच्या समस्या सोडविण्यास भाऊ नेहमीच प्रयत्नशील आहेत. 

फक्त आमचेच नाहीत तर इतरांच्या समस्या सोडविण्यात भाऊ अग्रेसर आहेत.  एखादी समस्या त्याच्या समोर आली की ती  तडीस नेणे ही त्यांची खासियत. चंद्रपूर मधील कार्यालयात खोलीभर नीट नेटक्या पद्धतीने मांडलेल्या नस्ती(फाईल्स) त्यांच्या कामाची, व कर्तबगारीच्या साक्ष देतात. 

प्रत्येकालाच ते आपलेसं वाटतात. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतांना जिल्हा परिषद अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या समस्या होत्या. त्यांचे काही कर्मचारी माझ्या संपर्कात होते त्यांना मी सूचवले एकदा भाऊना भेटा, ते सर्व डाव्या व समाजवादी विचारांचे होते, पण भाऊना भेटायला ते भाजपाच्या नाशिक कार्यालयात आले.

भाऊनी त्यांचा ही विषय ताकदीने शासन दरबारी मांडला. हेच नाहीतर अनेक संवर्गातील लोकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या. त्यामुळेच मी नेहमीच सांगतो भाऊ भा.ज.पा.तील एक आश्वासक व अपरोचेबल (approachable) चेहरा आहेत. 


फक्त सामाजिक नाही तर राजकीय प्रगल्भता व दूरदृष्टी ही त्यांच्या कार्यात आहे. प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण राज्य ते फिरले व कार्यकर्तायांना ताकत दिली. 

सुधीरभाऊ भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतांना मी जुने नासिक मंडल अध्यक्ष होतो. माझ्या डोक्यात अनेक दिवसांपासून भा.ज.पा ने युती तोडून स्वयंम बळावर लढावे ही इच्छा होती व हीच इच्छा बहुतेक कार्यकर्त्यांची होती. नाशिक महानगर पालिकेच्या निवडणूक जाहीर झाली होती, मी नासिक शहरातील सर्वच मंडल अध्यक्षांना (सिनकर, पेशकार, संभेराव, पगारे, दिक्षित) बरोबर घेतले आमचा पक्का एक विचार केला व सदर विचार शहर अध्यक्ष सावजी कडे मांडला.  त्यांना ही तो पटला.  सावजीच्या नेतृत्वात आम्ही शहराचे एक शिष्टमंडळ घेऊन भाऊना भेटायला गेलो.  सावजीनी आमची भूमीका मांडली.  त्याच वेळी इतर महानगर पालीकेच्या ही निवडणूका होत्या , तेथील युतीची घोषणा सायंकाळी   झाल्यानंतर, भाऊनी मला खाजगीत विचारले आत्ता आहे तेवढ्या जागा येतील ना.  त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही निश्चिंत पणे जा तुम्हाला हवा तोच निर्णय घेऊ. पहिल्यांदाच, भाजप-सेना युती झाल्यानंतर भाजप नाशिक महानगर पालिका निवडणुक स्वयंम बळावर लढली , त्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले. नंतर हीच रणनिती महाराष्ट्र भर स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी राबविण्यात आली. त्यामुळेच कार्यकर्तांना ताकत देणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

 महाराष्ट्रातील काना कोपर्‍यातून लोक समस्या घेऊन, विश्वासाने भाऊन कडे येतात. 

अश्या ह्या लोकनेत्याचा आज वाढदिवस. 

मी आई तुळजा भवनी चरणी प्रार्थना करतो की सुधीर भाऊना उदंड आयुष्य देवो. 


- योगेश कासारपाटील

 संस्थापक

 महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन

 महाराष्ट्र राज्य