माझा मित्र सुधीर अहिरे ने शालेय कॉलेज जीवनापासून एक स्वप्न उराशी बाळगले होते, स्वतःचा संगीत अल्बम करायचा. सुरवातीला मला वाटले काही दिवसात हे भूत उतरेल. पण काका शीतल (एलेक्स) बरोबर संध्याकाळ त्यांची संगीतमय व्हायची. तेव्हा वाटले संगीता बाबत हे गंभीर आहे. सुधीरची इच्छा होती मेडिकल ला जायची. मला ही वाटत होते की हा हे करू शकेल. तेव्हा त्याच्या वयोगटातील मित्र मंडळात तोच थोडा अभ्यासात हुशार होता. पण सुधीर पडला सूर्यवंशी अनेक दिवस त्याला मी सकाळी लवकर उठवण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्रयत्नाना यश आले नहीं. मैत्री मात्र वृंदिगत झाली माझ्या राजकीय व सामाजिक कामात मी चूक की बरोबर हे कळत नसताना ही, तो खंबीर पणे माझ्या बोरोबरीने थांबला.
भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी ही संकल्पना पक्षात मी प्रथम मांडली. ती नंतर वरिष्ठ स्तरावरून ही चर्चेला गेली व त्यास मण्यता मिळाली. नाशकात विद्यार्थी आघाडी स्थापन करण्यात सुधीर चा माझ्या बोरबर मोठा वाटा होता. सात एक महाविद्यालयात आम्ही २ महिन्यात आघाडी निर्माण केली. तो असा काळ होत जेव्हा दलित, बहुजन भाजापा कडे येण्यास उत्सुक न्हवते. सुधीर सर्वांसाठीच नहेमी उपलब्ध असायचा. आज ही त्याचा संपर्क सर्वांशी आहे.
नंतर त्याच शिक्षण, विवाह , नोकरी, कुटंब त्याच्या सांसारिक अडचणी नोकरी निमित मुंबईत वास्तव्य ह्या सर्वात संपर्क कमी झाला पण ओलावा तोच होता.
काही दिवसा पूर्वी त्याचा मला फ़ोन आला माझ्या संगीत अल्बम चा मुहूर्त आहे. मी म्हंटले सकाळीच ना . त्यानी नकी ठिकाण सांगितले न्हवते मी अर्धा तास तपोवनात थाबून निघालो कारण मला पुढे पारोळा किल्ल्याची स्थळभेट होती (साइट विज़िट). दुसऱ्या दिवशी फोन झाला ज्या बाजूला मी गेलो नाही नेमका तिथेच त्यानी शूट ठेवले होते. एर्वी अकरा बारा ला उठणारा गडी त्या दिवशी पहाटेच उठला होता. माझ्या साठी हे सुकद्ध आश्चर्य होते. पण अनेक दिवस जगलेले स्वप्न आज मुहूर्त रुपात साकारत होते. गाण्याचे चित्रीकरण झाले रेकॉर्डिंग झाले प्रयोग शाळेत सर्व संस्कार झाले.
व परवा त्याच्या म्यूजिक अल्बम चे लोकार्पण झाले. सुधीर स्वतःच ह्या अल्बम चा निर्माता आहे डी आय म्यूजिक तर्फे ह्याची तुझे लास्ट सीन हे गाणे सुधीर ने स्वतःच त्याच्या स्वमधूर आवाजात गायले आहे.
आपण सर्वांनी ते नक्की एकाव.
गाण्याची लिंक ( https://youtu.be/oB2aWJgaW7U?si=iASgKDzmFYioF7uy )
योगेश कासारपाटील
०८/०२/२५
www.ajinkyatara.org

