आज संगमेश्वर, रत्नागिरी येथे आढावा बैठक होती. घर, कार्यालय, कार्यस्थळ असे निवांत क्षण आम्हा दोघांना कमीच, पण मग ते क्षण पण क्षणभर गारवा देवून जाता.
ह्या बर्फमालाई , पयोहिम पासून दूर राहणारा मी व आईसक्रीम अतिशय आवडीने खाणारी ती.
संगतीचा परिणाम, प्रभाव पडणारच. आईसक्रीम अवडत नाही असे नाही सर्वच गोड पदार्थ मला आवडता. पण गार पदार्थांचा त्रास होतो म्हणून गार पदार्थ मी टाळायचो पण मग हळू हळू आईसक्रीम ची सवय लागली कधीतरी आईस्क्रीम खाणारा मी नेहमीच आईस्क्रीम खाऊ लागलो.
भा वी कुलकर्णी साहेब तत्कालीन सहायक संचालक पुरातत्त्व विभाग ह्यानी २०१४ ला प्रितम आईस्क्रीम संगमेश्वर, रत्नागिरी ची ओळख करुन दिली. संगमेश्वर ला आलो कि स्थळ भेटी कामे आटोपली की प्रीतम मधे आवळा, मोरावळा, कोकम सरबत व नंतर त्यांच्याकडेच तयार होणारे फणस व जांबुळ आइसक्रीम आलेच. इतर बरेच स्वाद ही त्यांच्याकडे आहेत. देसाई वाड्या कडे वळताना उजव्या हातालाच प्रीतम आईस्क्रीम आहे.
कसबा संगमेश्वर च्या वास्तू वारसा मोठा आहे, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, देसाई वाडा व अवशेष, वाड्याच्या बाजूला प्राचीन मंदिर समुह, श्री कर्णेश्वर मंदिर, खाली वरुणा व शास्त्री च्या संगमावर श्री संगमेश्वर, श्री काशी विश्वेश्वर, श्री सोमेश्वर व इतर छोटी मोठी मंदिरे, गावातील अप्रतिम वाडे हा प्राचीन वास्तू वारसा बघून झाला की प्रीतम आईस्क्रीम ला क्षुधाशान्ति केलीच पाहिजे. हापूस च्या हंगामात आला तर घरी हापूस न्यायला विसरू नका.
#Heritage #Wada #Temple #History #Archaeology #Architecure #History
#Localcusine #Cusine
#Icecream #food
#Sangmeshwar #Kasba
#The_Kasapatil

No comments:
Post a Comment